तानाजी सावंत आणि नवनीत राणांवर सुषमा अंधारेंची टीका

तानाजी सावंत आणि नवनीत राणांवर सुषमा अंधारेंची टीका

| Updated on: Mar 31, 2023 | 7:48 AM

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांचा चांगलाच समाचार घेत नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर कलेल्या केलेल्या पोस्टरबाजीवर खरमरीत टीका केली आहे

ठाणे : महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री तानाजी सावंत यांनी धाराशिव येथील जाहीर सभेत तत्कालिन ठाकरे सरकारला पाडण्यासाठी आपण दोन वर्षांत 100 ते 150 बैठका घेतल्या. देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशावरून शिवसेना आणि भाजपने धाराशिव जिल्हा परिषदेची निवडणूक एकत्र लढवली आणि येथूनच युतीला सुरुवात झाल्याचा गौप्यस्फोट केला होता. त्यावरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तानाजी सावंत यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. तसेच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर कलेल्या केलेल्या पोस्टरबाजीवरही खरमरीत टीका केली आहे.

यावेळी अंधारे यांनी तानाजी सावंत हे हुशार आहेत. तर शिंदे यांनी शिवसेना सोडताना जी कारणं सांगितली ती सर्व कारणे खोटी आहेत. तर जे सरकार आणणयासाठी आपण 100 ते 150 बैठका घेतल्या त्यानंतर मुख्यमंत्री पद आपल्याला मिळाले नाही. त्यावरून ते अस्वस्थ आहेत अतृप्त आहेत. कदाचित मुख्यमंत्री पदाचा दावेदार एकनाथ शिंदे नाही तर मी आहे असे त्यांना सांगायचे असेल असा टोला त्यांनी लगावला. तर नवनीत राणा यांनी पोस्टरबाजीमध्ये वेळ घालवण्यापेक्षा अमरावतीमध्ये 176 बालके महिला रुगलालयात व्हेंटीलेटर उपलब्ध नसल्याने दगावल्याची माहिती मिळत आहे. याला कोण कारणीभूत आहे. त्याकडे लक्ष द्याव असा घणाघात केला आहे.

Published on: Mar 31, 2023 07:48 AM