Special Report | कोट तयार फक्त बटन लावणे बाकी? अजून मंत्रिमंडळ विस्तार मुहूर्त सापडेना? काय कारण?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे सांगितलं आहे. मात्र हे लवकर म्हणजे कधी असा सवालच आता भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आपआपसात विचारत आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यमंत्री मंडळाचा विस्तार हेईल असे बोलले जात आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता पर्यंत अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असे सांगितलं आहे. मात्र हे लवकर म्हणजे कधी असा सवालच आता भाजपसह शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आपआपसात विचारत आहेत. तर राज्यातील या मंत्रिमंडळ विस्ताराला केंद्र सरकारचा म्हणजेच केंद्रातील भाजपकडून ब्रेक लागल्याचे आता समोर येत आहे. कारण जो पर्यंत केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत नाही. तोपर्यंत राज्यातील मंत्रिमंडळ विस्तार ही होणार नाही असेच बोलले जात आहे. केंद्र सरकारच्या वतिने शिंदे गटाला दोन मंत्रीपद दिले जाणार आहे. याच्याआधी शिंदे-ठाकरे गटाची सुनावणीमुळे हा केंद्र सरकारसह राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला होता. आता मात्र केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार लांबणीमुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला ब्रेक लागण्याची शक्यता आहे. तर आमदारांनी कोट शिवला मात्र विस्तार रखडला अशीच अवस्था सध्या राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची झाली आहे. त्यावर हा स्पेशल रिपोर्ट