उमेदवार जोमात, अधिकारी कोमात, चिल्लर मोजता मोजता झाली दमछाक
प्रमुख दावेदारांनी शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याच्या चर्चेचा धुरळा विरतो न विरतो तोच पुन्हा एका अपक्ष उमेदवाराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उमेदवार राजू काळे यांनी
पुणे : पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीतदाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी अधिकाऱ्यांना घाम फोडणारी एक घटना घडली. या निवडणुकीतील प्रमुख दावेदारांनी शक्तीप्रदर्शन करत आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्याच्या चर्चेचा धुरळा विरतो न विरतो तोच पुन्हा एका अपक्ष उमेदवाराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. उमेदवार राजू काळे यांनी अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. हा अर्ज भरण्यासाठी त्यांनी दहा हजार रुपये डिपॉझिटसाठी आणले होते. पण, ही रक्कम त्यांनी गोणीमध्ये भरून आणली होती. २ रुपये, ५ रुपये आणि दहा रुपयांच्या नाणी भरलेली या गोण्या पाहून अधिकारीही चक्रावले. नाईलाज म्हणून अधिकाऱ्यांना ती नाणी मोजावी लागली. पण, इतक्या मोठ्या प्रमाणात ही नाणी मोजताना त्यांची चांगलीच दमछाक झाली.
Published on: Feb 08, 2023 07:40 AM
Latest Videos