Ashok Chavan | 'कोणी मला भेटू ही शकत नाही का?', अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली खंत

Ashok Chavan | ‘कोणी मला भेटू ही शकत नाही का?’, अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली खंत

| Updated on: Sep 03, 2022 | 5:40 PM

Ashok Chavan | आता कोणी मला भेटू ही शकत नाही का?, अशी व्यथा व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीवरुन ज्या वावड्या अथवा बातम्या पेरल्या जात आहेत. त्यावर अशोक चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली.

Ashok Chavan | आता कोणी मला भेटू ही शकत नाही का?, अशी व्यथा व्यक्त करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीवरुन ज्या वावड्या अथवा बातम्या पेरल्या जात आहेत. त्यावर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी नाराजी व्यक्त केली. देवेंद्र फडणवीस आणि अशोक चव्हाण यांची एका कार्यक्रमात गाठभेट झाली. त्यावेळी त्यांच्यात चर्चा झाली. त्यानंतर चव्हाण हे त्यांच्या खास लोकांसह भाजपच्या (BJP) गोटात जाणार असल्याच्या चर्चा प्रसार माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. त्यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी बातम्या पेरणाऱ्यांचा तिखट समाचार घेतला. अशोक चव्हाण हे काँग्रेसचे जूने नेते असून भाजपच्या गोटातून मुद्दाम अशा बातम्या पेरण्यात येत असल्याचा दावा करत याविषयीच्या अफवांचे काँग्रेसकडून खंडण करण्यात आले. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी ही अशा वावड्यांना अर्थ नसल्याचे सांगितले. तसेच प्रसार माध्यमांतून देण्यात येत असलेल्या या भेटीसंदर्भातील चुकीच्या बातम्यांबद्दल नाराजी व्यक्त केली.

Published on: Sep 03, 2022 05:40 PM