CIDCO bogus employee scam : सिडकोतील बोगस कर्मचारी घोटाळ्यात मोठी अपडेट, सीबीडी पोलिसांकडून हालचालींना वेग
तर 15 ते 20 बोगस कर्मचारी सिडकोचा पगार लाटत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. तर या कर्मचाऱ्यांना 50 ते 60 हजार रुपये पगार दिला जात होता असेही उघड झाले आहे.
मुंबई, , 8 ऑगस्ट 2023 | मुंबई सिडकोतल्या बोगस कर्मचारी घोटाळ्याने अनेकांना धक्काच दिला होता. येथे बोगस कर्मचारी घोटाळा 2017 पासून सुरू असल्याचं उघड झालं होतं. तर 15 ते 20 बोगस कर्मचारी सिडकोचा पगार लाटत असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती. तर या कर्मचाऱ्यांना 50 ते 60 हजार रुपये पगार दिला जात होता असेही उघड झाले आहे. तर धक्कादायक बाब म्हणजे या बोगस कर्मचाऱ्यांच्या नावाने कोट्यावधी रुपये लाटण्यात आल्याचेही बोलले जात आहे. आता या प्रकरणी सीबीडी पोलिसांकडून हालचाली सुरू झाल्या असून त्यांच्याकडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले जाणार आहे. तर याप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत सिडकोतील अधिकारी आणि कर्मचारी यांची चौकशी होऊ शकते. त्यामुळे आता या बोगस कर्मचारी घोटाळ्या प्रकरणी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे.
Published on: Aug 08, 2023 09:16 AM
Latest Videos