‘100 कोटींचा आरोप केला पण चार्जशिट्समध्ये काय…,’ काय म्हणाल्या सुप्रिया सुळे
सत्ता आणण्यासाठी सचिन वाझे याच्याकडून बोलवून घेतले जात आहे, राज्यात सत्तेत कायम राहण्यासाठी किती गलिच्छपातळीवर राजकारण केले जात असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
बडतर्फ पोलिस अधिकारी आणि अँटिलिया स्फोटकं प्रकरण तसेच हिरेन मनसुख हत्याकांडातील आरोप सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. तळोजा तरुंगात असलेल्या वाझे याला कोर्टात आणत असताना त्याने ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेशी बोलताना आरोप केला आहे की अनिल देशमुख यांच्यापर्यंत त्यांच्या पीएमार्फत खंडणीचा पैसा जात होता. असे आपण पत्र लिहीले असल्याचे आरोपी सचिन वाझे म्हणाला आहे. मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाजवळ स्फोटकं ठेवल्याच्या प्रकरणात वाझे आरोपी आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले मत मांडले आहे. त्या म्हणाल्या की 100 कोटीचा आरोप करताय परंतू अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने दाखल केलेल्या चार्जशिटमध्ये कसलाच उल्लेख कसा नाही. केवळ सत्तेत येण्यासाठी भाजपाचे किती गलिच्छ राजकारण सुरु आहे हे किती दुर्देवी आहे, अशी टिका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. अर्थात हे सर्व प्लांटेट आरोप आहेत असेही सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.