Odisha Train Accident : सीबीआय पोहचलं बालसोरमध्ये; अपघातचं की आणखी काही? गूढ उकलणार?
संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तपासासाठी आलेली सीबीआय आता या तिन्ही गाड्यांची टक्कर कोणत्यातरी कटातून झाली होती की केवळ अपघात होता, ज्यात अनेक निष्पाप जीव गेले होते, हे शोधण्यात व्यस्त आहे.
बालसोर : ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताची चौकशी करण्यासाठी सीबीआय घटनास्थळी पोहोचली आहे. 2 जून रोजी झालेल्या बालासोर रेल्वे अपघातात आतापर्यंत 278 जणांचा मृत्यू झाला आहे. संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. तपासासाठी आलेली सीबीआय आता या तिन्ही गाड्यांची टक्कर कोणत्यातरी कटातून झाली होती की केवळ अपघात होता, ज्यात अनेक निष्पाप जीव गेले होते, हे शोधण्यात व्यस्त आहे. तर हा तपास करण्यासाठी 10 जणांचे सीबीआय पथक काम करत आहे. तर बालासोर दुर्घटनेची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस खुद रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीच केली होती. तर काही रेल्वे विभागाच्या म्हणण्यानुसार, जोपर्यंत जाणूनबुजून छेडछाड होत नाही, तोपर्यंत इंटरलॉकिंग सिस्टिममध्ये बदल करता येणार नाही त्यामुळे या अपघाच्या अनुशंगाने सर्व बाजूने तपाय करण्यासाठी आता सीबीआयच्या 10 सदस्यांचं पथक बालसोरमध्ये दाखल झालं आहे.