CBSE 12th Results 2022 : सीबीएसई बारावीचा निकाल जाहीर! निकाल कुठे तपासायचा? जाणून घ्या….
सीबीएसईच्या निकालात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. 94.54% विद्यार्थिनी आणि 91.25% विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झालेत. जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.93 टक्के लागला आहे, तर केंद्रीय विद्यालयाचा (CBSE) निकाल 97.04 टक्के लागलाय.
मुंबई : महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल काही दिवसांआधी जाहीर झाला आहे. यानंतर सीबीएसईच्या निकालाची प्रतीक्षा होती. आज ती देखील संपलीय. सीबीएसईनं आज सकाळी बारावीचा निकाल (12th Results) जाहीर केला आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर (CBSE Official Website) निकाल तपासू शकतात. नुकताच केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी निकाल जाहीर होण्याबाबत सांगितलं होतं की, “सीबीएसईचा निकाल जाहीर होण्यास कोणताही विलंब झालेला नाही. 2 बोर्डाची टर्म परीक्षा 15 जून रोजी संपली आणि त्यानंतर तपासणीचे काम सुरू झाले. सीबीएसईच्या निकालात विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. 94.54% विद्यार्थिनी आणि 91.25% विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. जवाहर नवोदय विद्यालयाचा निकाल 98.93 टक्के लागला आहे, तर केंद्रीय विद्यालयाचा (CBSE) निकाल 97.04 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात त्रिवेंद्रमने सर्व झोनमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे.