अमरावती मतदारसंघ पुन्हा चर्चेत, नवनीत राणांसह दोन उमेदवारांना आयोगाकडून नोटीस; काय आहे प्रकरण?

| Updated on: May 05, 2024 | 11:46 AM

भाजपकडून नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अमरावती लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता वेगळ्या कारणामुळे हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवाराना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नोटीस

Follow us on

अमरावती लोकसभा मतदारसंघ हा उमेदवार जाहीर होण्यापूर्वीपासूनच चर्चेत आहे. यानंतर भाजपकडून नवनीत राणा यांना लोकसभेचं तिकीट मिळाल्यानंतर पुन्हा एकदा अमरावती लोकसभा मतदारसंघाची चर्चा सुरू झाली होती. मात्र आता वेगळ्या कारणामुळे हा मतदारसंघ पुन्हा चर्चेत आला आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघातील तीन उमेदवाराना केंद्रीय निवडणूक आयोगाकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या उमेदवारांमध्ये नवनीत राणा यांचाही समावेश आहे. निवडणूक खर्चाच्या हिशोबाचा ताळमेळ जुळत नसल्याने आयोगाकडून ही नोटीस देण्यात आली आहे. खासदार नवनीत राणा, आमदार बळवंत वानखडे आणि दिनेश बुब या तीन उमेदवारांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवल्या आहेत. सँडो रजिस्टर आणि उमेदवाराने दाखवलेल्या खर्चात मोठी तफावत असल्याने ही कारवाई करण्यात आली आह. नवनीत राणांनी 17 लाख 30 हजार, बळवंत वानखडे 24 लाख 1 हजार तर दिनेश बूब यांनी 28 लाख 47 हजारांचा खर्च दाखवला आहे. दरम्यान, निवडणुकीत 95 लाखांपर्यंत खर्च करण्याची निवडणूक विभागाची मुभा आहे.