Breaking | भारत सरकारनं रेमडेसिवीरची निर्यात थांबवली, कोरोना स्थिती आटोक्यात येईपर्यत निर्यातबंदी

| Updated on: Apr 11, 2021 | 5:59 PM

भारत सरकारनं रेमडेसिवीरची निर्यात थांबवली असून कोरोना स्थिती आटोक्यात येईपर्यत निर्यातबंदी लागू असेल. remdesivir injection export ban

नवी दिल्ली : वाढत्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा तुटवडा भासत असल्यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या रेमेडेसिव्हीर इंजेक्शनची निर्यात थांबवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. जोपर्यंत देशातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात येत नाही, तोपर्यंत रेमेडेसिव्हीरचे इंजेक्शन बाहेर देशात निर्यात केले जाणार नाही; असं केंद्र सरकारने म्हटलं आहे.