तुमच्या ढेरीवर काहीही बोलले, आवडलं नाही आपल्याला; भुमरेंचा कार्यकर्ता खैरेंवर भडकला

तुमच्या ढेरीवर काहीही बोलले, आवडलं नाही आपल्याला; भुमरेंचा कार्यकर्ता खैरेंवर भडकला

| Updated on: Apr 05, 2023 | 7:47 AM

गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. त्यांनी त्यांच्या ढेरीवरून टोमणे मारले होते

छत्रपती संभाजीनगर : केंद्रातील भाजप आणि राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर येथे मविआच्या वज्रमूठ सभेतून उद्धव ठाकरे यांनी जाहीर टीका केली. त्यासभेतून त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला. याच सभेत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरेंनी पालकमंत्री संदिपान भुमरे यांच्यावर शेलक्या भाषेत टीका केली होती. त्यांनी त्यांच्या ढेरीवरून टोमणे मारले होते. तेच टोमणे भुमरे यांच्या कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागल्याचे दिसत आहे. सध्या हाच फोन कॉल चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात कार्यकर्ता भुमरे यांना, ठाकरे यांची सभा जबरदस्त झाली. आपल्यालाही आफली ताकद दाखवावी लागेल. संभाजीनगरपेक्षा पैठणमध्ये सभा घेऊ. तर आपल्यावर खैरे यांनी केलेली टीका आवडलेली नाही. त्यांच्याकडे बघा, असं कार्यकर्त्यानं भुमरे यांच्याकडे मागणी केली आहे. सध्या भुमरे आणि या कार्यकर्त्यातील संभाषण व्हायरल होत आहे.

Published on: Apr 05, 2023 07:47 AM