कोरोनाबाधित व्यक्ती घरी असल्यास हवा खेळती ठेवा, कोविड संक्रमणासंदर्भात केंद्राच्या सूचना

| Updated on: May 20, 2021 | 5:08 PM

कोरोना बाधित व्यक्ती घरी असेल तर घरात हवा खेळती ठेवा, अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. (Corona virus new guidelines)

नवी दिल्ली: कोरोना बाधित व्यक्ती घरी असेल तर घरात हवा खेळती ठेवा, अशा सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या आहेत. लक्षण नसलेली व्यक्ती संक्रमणाचा बळी ठरते. कोरोना विषाणू संसर्गित व्यक्ती घरात असल्यास कोरोना संसर्गाचा धोका वाढू नये म्हणून हवा खेळती ठेवण्याचे निर्देश केंद्र सरकारनं दिले आहेत. संक्रमित व्यक्तीची लाळ, थुंकी आणि शिंकेतून संक्रमणाचा धोका असतो. त्यामुळे हवा खेळती ठेवा, अशा सूचना केंद्राकडून देण्यात आल्या आहेत.