Kishori Pednekar | केंद्र सरकारकडून खासगी रुग्णालयांना लस, मात्र पालिकेला नाही : किशोरी पेडणेकर

| Updated on: Jun 02, 2021 | 1:48 PM

मुंबईतील लस तुटवड्यावर बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, मी काल ऐकलं की खासगी सेक्टर थेट केंद्राकडून लस खरेदी करत आहे आणि पैसे मोजून ते लोकांना देत आहे. म्हणजे इथे लस घेणाऱ्या नागरिकांना पैसे मोजावे लागत आहेत. आपण मात्र मोफत लस देत आहोत आणि मोफतच देणार. आम्ही देखील पैसे मोजण्यास तयार आहोत, मात्र केंद्राकडून आपल्याला तेवढा साठा मिळत नाहीय.