अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा: नागाळा पार्क मैदानावर सभा, दसरा चौकात विशेष स्टेज, पाहा...

अमित शाह यांचा कोल्हापूर दौरा: नागाळा पार्क मैदानावर सभा, दसरा चौकात विशेष स्टेज, पाहा…

| Updated on: Feb 16, 2023 | 10:28 AM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापुरात अमित शाहांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येतेय. पाहा...

कोल्हापूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शनिवारी कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. कोल्हापुरात अमित शाहांच्या दौऱ्याची जय्यत तयारी करण्यात येतेय. अमित शाह दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करणार आहेत. दौऱ्याच्या निमित्ताने छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्या शेजारी विशेष स्टेज उभारलं आहे. अमित शाह यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विशेष स्टेज उभारलं आहे. नागाळा पार्कातील मैदानावर अमित शहांची जाहीर सभा देखील होणार आहे. कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांना अमित शाह मार्गदर्शन करणार आहेत. कोल्हापुरात जिल्ह्यात कमळ फुलवण्यासाठी भाजपची जोरदार तयारी सुरु आहे.

Published on: Feb 16, 2023 10:05 AM