नारायण राणे यांनी ‘त्या’ घटनेवरून शरद पवार यांना घेरले, म्हणाले आता तरी…
राजकारणाबरोबर, खाजगी विमानातून प्रवास करणाऱ्या गुन्हेगारांच्या प्रकरणाची समितीने माहिती घेतलेली होती. ही समिती केंद्र सरकार नेमली, त्याचा अहवालही दिला आणि पवार साहेबांना त्यात कोणाकोणाची नावं आहेत हे माहित आहे. आता तरी पवार साहेब देश प्रथम ही भूमिका घेणार आहात का?
मुंबई | 19 ऑक्टोंबर 2023 : दहशतवाद कुणा एका व्यक्ती किंवा देशाविरुद्ध नसून तो माणुसकीच्या विरोधात असतो ही देशाची भूमिका पंतप्रधान मोदीजीं संयुक्त राष्ट्र संघ सारख्या व्यासपीठावर मांडत आले आहेत. या धोरणाप्रमाणे त्यांनी दहशतवादी हल्ल्याविरोधी देशाची भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी पॅलेस्टाईनच्या विरोधात नव्हे तर दहशतवादाच्या विरोधात भूमिका घेतली, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर पलटवार केलाय. दहशतवाद विरोधी भूमिका घेणे चुकीची आहे असे पवार साहेबांना म्हणावयाचे आहे काय? दहशतवादी एकच आहेत असे पवार साहेबांना म्हणायचे आहे काय? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले आहेत. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी दहशतवाद्यांना वाचवायचं किंवा पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला नव्हता काय? अशी टीकाही राणे यांनी केली.