रामदास आठवले यांना हवंय राज्यात एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद, इंडिया आघाडीलाही लगावला टोला
राहुल गांधी हे कच्च्या बुद्धीचे आहेत. एवढी वर्ष काँग्रेसने काय केलं त्याचे उत्तर त्यांनी द्यावं. विरोधी पक्षाने इंडिया हे नाव न घेता निवडणुका लढवाव्या. आम्ही इंडिया विरोधात लढलो तर लोक आम्हाला इंडिया विरोधी समजतील. त्यामुळे विरोधी पक्षानी indi हे नाव घेऊन निवडणुक लढवावी.
मुंबई : 10 ऑक्टोबर 2023 | राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह हे अजित पवार यांच्या गटालाच मिळणार आहे. अजित पवार यांच्याकडे अनेक आमदारांचा पाठिंबा आहे. निवडणूक आयोगाने ज्याप्रमाणे शिवसेना शिंदे गटाला धनुष्यबाण चिन्ह दिलं. त्याचप्रमाणेच अजित पवार गटालाही घड्याळ चिन्ह मिळणार आहे, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलंय. इंडिया हे भारत देशाचं नाव आहे. त्यामुळे विरोधी पक्षाने इंडिया हे नाव न घेता निवडणुका लढवाव्या. आम्ही जर इंडिया विरोधात लढलो तर लोक आम्हाला इंडिया विरोधी समजतील. म्हणून विरोधी पक्षानी indi हे नाव स्वीकारून निवडणुका लढवाव्या असा टोला त्यांनी लगावला. राज्यात शिर्डी आणि सोलापूर मतदार संघ हा आरक्षित मतदारसंघ असल्यामुळे या दोन्ही जागा आमच्या रिपब्लिकन ऑफ पार्टी पक्षाला मिळाव्या. त्याचप्रमाणे आगामी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात आपल्या पक्षाला एक कॅबिनेट आणि दोन राज्यमंत्री पद मिळावी अशी आमची अपेक्षा आहे, असे ते म्हणाले.