महिला आयोगाला चित्रा वाघ यांनी घेतले लाईटली; म्हणाल्या, ५६ आल्या त्यात एकची भर
आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. तर याप्रकरणी खुलासा सादर करावा, असेही चाकणकर म्हणाल्या. यावर आता चित्रा वाघ यांनीही उत्तर दिले आहे
मुंबई : भाजपच्या चित्रा वाघ यांनी बोल्ड आणि बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाणाऱ्या उर्फी जावेदवर तुफान टीका केली. तर तिच्या कपड्यांची स्टाईल यावरून खुप बोलल्या. त्याचबरोबर वाघ यांनी पत्रकार परिषद घेत थेट राज्य महिला आयोगावरच आक्षेप घेतला. त्यावर आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन, चित्रा वाघ यांनाच नोटीस पाठवल्याची माहिती दिली. त्यानंतर आता याप्रकरणात आणखीन तेढ निर्माण झाला आहे.
आयोगाचा अवमान केल्याप्रकरणी चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. तर याप्रकरणी खुलासा सादर करावा, असेही चाकणकर म्हणाल्या. यावर आता चित्रा वाघ यांनीही उत्तर दिले आहे.
याप्रकरणी प्रत्युत्तर देताना वाघ यांनी, स्त्री सन्मानाचा सामाजिक विषय धार्मिक आणि पक्षीय राजकारणात पिसला जातोय याचे आज मनात शल्य आहे. राहिला विषय नोटीसीचा तर मला येणाऱ्या अशा ५६ नोटीशीत आणखी १ ची भर..! अशी प्रतिक्रिया वाघ यांनी दिली.