सिंहगड एक्सप्रेसमध्येही रंगाची उधळण, चाकरमान्यांनी लूटला धुळवडीचा आनंद

सिंहगड एक्सप्रेसमध्येही रंगाची उधळण, चाकरमान्यांनी लूटला धुळवडीचा आनंद

| Updated on: Mar 07, 2023 | 4:13 PM

मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी सिंहगड एक्स्प्रेसमध्ये रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली

पुणे : कोरोनाच्या काळानंतर आता पहिल्यांदाच यावर्षी सगळे सण, उत्सव मोठ्या जोरात आणि जल्लोशात साजरे केले जात आहेत. यावेळी यात रंगाची भर पडलेली आहे. काल होळी साजरी झाल्यानंतर आज मोठ्या उत्साहात धुळवडीला सुरुवात झाली आहे. सकाळपासून तरुणाई रंगात न्हाऊन निघाली आहे. सर्वत्र मोठ्या उत्साहात नागरिक धुळवड साजरी करताना दिसत आहे. यावळी प्रवासात असणाऱ्या चाकरमान्यांनी देखिल रंगांची उधळण करत आपला आनंद साजरा केला. मुंबई-पुणे रेल्वे प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांनी सिंहगड एक्स्प्रेसमध्ये रंगाची उधळण करत धुळवड साजरी केली.