पंकजा मुंडे यांना बीआरएस, एमआयएमची ऑफर, भाजप नेता म्हणतो…
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएसने थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत पक्षात येण्यासाठी आवाहन केलं आहे. तर एमआयएमने आम्ही तर पंकजा यांना दोन वर्षापुर्वीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता भाजपची मात्र डोकेदुखी वाढली आहे. भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
बारामती: भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना बीआरएसने थेट मुख्यमंत्रीपदाची ऑफर देत पक्षात येण्यासाठी आवाहन केलं आहे. तर एमआयएमने आम्ही तर पंकजा यांना दोन वर्षापुर्वीच मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. यामुळे आता भाजपची मात्र डोकेदुखी वाढली आहे. भाजप प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. “मी वारंवार सांगतो की पंकजाताई या गोपीनाथ मुंडे यांच्या सावलीखाली वाढल्या आहेत. त्यांच्या रक्ता रक्तात कमळ आहे. त्या भाजपच्या नेत्या आहेत. त्या कधीही या एमआयएम किंवा बीआरएसचा विचार करु शकत नाहीत.मूळात या लोकांना अद्याप महाराष्ट्र समजलाच नाही. 40 वर्षे लागली भाजप वाढवायला.शरद पवार यांना कित्येक वर्षे लागली सत्ता आणायला.त्यामुळे कुणी आज येईल आणि सांगतील हे करा ते करा. तर ते होणार नाही.पंकजाताईबद्दल मी 1 लाख टक्के सांगतो.कुणी असा प्रयत्न केला असेल तर त्या कधीही तोंडाकडेही पाहत नाहीत. त्यांच्या रक्तातही नाही.बीआरएस किंवा अन्य कुणी जातील तर त्या दरवाजा बंद करुन आत राहतील. पण दरवाजा उघडणार नाहीत,” असं बावनकुळे म्हणाले.