...यांना कुत्रंही विचारणार नाही, खेड्यातून आलेले; मी लल्लू पंजू नाही, शिवसेनेचे माजी खासदार भडकले 

…यांना कुत्रंही विचारणार नाही, खेड्यातून आलेले; मी लल्लू पंजू नाही, शिवसेनेचे माजी खासदार भडकले 

| Updated on: Sep 26, 2022 | 2:13 PM

मी लल्लू पंजू नाही, 20 वर्ष खासदार राहिलो. लोकसभेत अनेक प्रश्न मांडले. पाच वर्ष पालकमंत्री होतो. तेव्हा हा आमदार होता, अशी आठवण खैरेंनी सांगितली.

दत्ता कनवटे, औरंगाबादः चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पालकमंत्री असताना त्यांनी शहराला भकास केलं. पण मी विकास करणार आहे, असं वक्तव्य औरंगाबादचे पालक मंत्री संदिपान भूमरे (Sandipan Bhumre) यांनी केलंय. यानंतर चंद्रकांत खैरे चांगलेच भडकलेत. आज जे शहर दिसंतय नं ते चंद्रकांत खैरेंमुळे दिसतंय. त्याच्या (संदिपान भूमरेंच्या) घरापासून जो नॅशनल हायवे २११ गेलाय, तो म्हणाला थोडा बाजूला सरकवा…. तो मी केलाय. आणि आज हा पालकमंत्री (Guardian Minister) झाला तर याला अधिकारीच काय तर कुत्रही विचारणार नाही, अशी सणसणीत टीका चंद्रकांत खैरेंनी केली आहे. आधी हा खैरे साहेब, खैरे साहेब म्हणायचा, पण आरे तुरे करतो. ते पालकमंत्री झाले तरी त्यांना अधिकारी नाही, कुत्रंही विचारणार नाही, असं वक्तव्य खैरेंनी केलंय. हे खेड्यातून आले. आधी पाचोडलाच रहायचे. मी म्हटलं पैठण शहरात रहा. मग तिथं आले, असं खैरेंनी सांगितलं. मी लल्लू पंजू नाही, 20 वर्ष खासदार राहिलो. लोकसभेत अनेक प्रश्न मांडले. पाच वर्ष पालकमंत्री होतो. तेव्हा हा आमदार होता, अशी आठवण खैरेंनी सांगितली.

Published on: Sep 26, 2022 02:12 PM