अमित शाहा यांच्याकडे वाचाळवीरांची लिस्ट, संजय शिरसाट टॉपला, ठाकरे गटाची टीका

“अमित शाहा यांच्याकडे वाचाळवीरांची लिस्ट, संजय शिरसाट टॉपला”, ठाकरे गटाची टीका

| Updated on: Jun 06, 2023 | 9:24 AM

ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्या भेटीत शिंदे-फडणवीस यांना वाचाळवीरांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे.

औरंगाबाद : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. अमित शाह यांच्या भेटीत शिंदे-फडणवीस यांना वाचाळवीरांना मंत्रिमंडळात स्थान देऊ नका अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यावरून चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांच्यावर निशाणा साधला आहे. “संजय शिरसाठ, मंत्री अब्दुल सत्तर व मंत्री संदीपान भुमरे हे वाचाळवीर आहेत.यांच्यामुळे भाजपचं मतदार कमी होतंय.अमित शाह यांच्यांकडे वाचाळवीर यांची लिस्ट आहे.किस्को रखने का और किसको कट करणे का पता है. या वाचाळवीरांच्या लिस्टमध्ये संजय शिरसाट टॉपवर आहेत. मंत्रिमंडळ वाढेल की नाही माहीत नाही. एका जिल्ह्यात चार चार मंत्री देत नाहीत, संजय शिरसाट यांना प्रवक्ता करून मोकळं केलेलं आहे”, असं खैरे म्हणाले.

Published on: Jun 06, 2023 09:24 AM