Chandrakant Khaire | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम लवकर उरकल्यावरुन चंद्रकांत खैरेंची मुख्यमंत्र्यांवर आगपाखड
Chandrakant Khaire | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम लवकर उरकल्यावरुन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर आगपाखड केली.
Chandrakant Khaire | मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचा (Marathwada Mukti Sangram Din) कार्यक्रम लवकर उरकल्यावरुन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्यावर आगपाखड केली. मुख्यमंत्री यापूर्वी पैठण येथे जाहीर सभेसाठी आले होते. त्याठिकाणी मोठी सभा झाली. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी तोंडसूख घेतले होते. या सभेला 300 रुपये देऊन माणसे आणण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कालपासून औरंगाबादच्या दौऱ्यावर आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले होते. याही कार्यक्रमावेळी शिवसैनिकांनी गोंधळ घातला होता.
आज मुख्यमंत्र्यांनी सकाळीच मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या कार्यक्रमाला शिवसैनिकांनी हजेरी न लावता, मुख्यमंत्र्यानंतर मुक्तीसंग्राम दिनाचा कार्यक्रम केला. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांवर आगपाखड केली.