टक्केवारीच्या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्यानं भुमरे यांना पुन्हा डिवचलं; म्हणाला, 'कोण भुमरे?' 'टिनपाट माणूस ..'

टक्केवारीच्या आरोपानंतर ठाकरे गटाच्या नेत्यानं भुमरे यांना पुन्हा डिवचलं; म्हणाला, ‘कोण भुमरे?’ ‘टिनपाट माणूस ..’

| Updated on: Jun 06, 2023 | 3:17 PM

ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भुमरे यांच्यावर टक्केवारीचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर भुमरे यांनी पलटवार करताना आरोप नको तर ते सिद्ध करा असे आवाहन केलं आहे. तर लोकसभा आता काहीच महिन्यांवर आहे आपल्याविरोधात उभं रहा असे थेट आव्हानच खैरे यांना भुमरे यांनी दिलं होतं.

छत्रपती संभाजीनगर : राज्यातील शिंदे सरकारमधील एका पालकमंत्र्यावर टक्केवारीचा अरोप ताजा आहे. याचदरम्यान शिवसेनेचे आमदार छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदिपान भुमरे आणि त्यांच्या मुलावर गंभीर आरोप करण्यात आला आहे. ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी भुमरे यांच्यावर टक्केवारीचा आरोप केल्याने खळबळ उडाली आहे. त्यावर भुमरे यांनी पलटवार करताना आरोप नको तर ते सिद्ध करा असे आवाहन केलं आहे. तर लोकसभा आता काहीच महिन्यांवर आहे आपल्याविरोधात उभं रहा असे थेट आव्हानच खैरे यांना भुमरे यांनी दिलं होतं. त्यावरून खैरे यांनी थेट कोण भुमरे? त्याला मी असा हात पकडून तिकीट दिले होतं. आता हे विसरला तो. येत्या 8 तारखेला कार्यक्रम आहेच त्यावेळी त्याचा समाचार घेतला जाईल. तेथेच त्याची सगळी प्रकरणं काढतो. अजून मला त्यानं ओळखलेलं नाही. हा टिनपाट दारूवाला माणूस असल्याची टीका देखील त्यांनी केली आहे.

Published on: Jun 06, 2023 03:17 PM