“रामदास कदमांनी अनेकांना राजकारणातून संपवलं, भाई नावाचा अध्याय आता संपलाय”
Chandrakant Khaire on Ramdas Kadam : रामदास कदम पर्यावरण मंत्री असताना कोणा कोणाकडून खोके घेतलेत हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, अशा शब्दात चंद्रकांत खैरे यांनी जोरदार टिका केली आहे. पाहा...
खेड रत्नागिरी : रत्नागिरीतील खेडमध्ये उद्धव ठाकरे यांची सभा होतेय. या सभेआधी माजी खासदार, ठाकरेगटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर टीका केली आहे. “रामदास कदम यांनी कितीतरी लोकांना राजकारणातून संपवलं. मी खासदार असताना मलासुद्धा शिवीगाळ केली. त्यांचा बदला घेतला. लगेच ते आमच्या इथून दुसरीकडे गेले. खोके कोणाकडे जमा केले. कंपन्या बंद करा, अशा नोटिसा देण्यासाठी त्यांचा पीए मोठे खोके घेऊन यायचा. रामदास कदमांच सगळं नाटकं आहे. रामदास कदमांचा अध्याय आता संपला आहे, असं खैरे म्हणाले आहेत.
Published on: Mar 05, 2023 02:45 PM
Latest Videos