मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिरसाट फ्रस्टेड, काहीही बोलतात; ठाकरे गटाच्या नेत्याकडून नक्कल करत टीकास्त्र
Sanjay Shirsat : संजय शिरसाठ यांची अनेक लफडी आहेत. काढली तर त्यांची अनेक लफडी निघतील. आताच ते गोव्याला जाऊन जुगारमध्ये हरून आले. किती हरले त्यांना माहीत आहे, असं म्हणत टीका करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर : शिवसेना ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाठ यांची नक्कल करत टीका केली आहे. “संजय शिरसाठ काहीही बडबड करत असतात. तुम्ही जे खोके घेतले. ते घेऊन त्यांनी गप्प राहावं. मंत्रिपद न मिळाल्यामुळे संजय शिरसाठ फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत. त्यामुळे ते काहीही बोलतात”, असं चंद्रकांत खैरे म्हणाले आहेत. टीव्ही 9 मराठीशी बोलताना चंद्रकांत खैरे यांनी संजय शिरसाट यांच्यावर टीका केली आहे. शिरसाठ यांची अनेक लफडी आहेत. त्यांची अनेक लफडी निघतील. ते आताच ते गोव्याला जाऊन जुगारमध्ये हरून आले आहेत. किती हरले त्यांना माहीत आहे, असंही म्हणण्यात आलं आहे.
Published on: Mar 27, 2023 01:18 PM
Latest Videos