देवेंद्रजी, हिरव्या सापाला उचलून फेकून द्या, अब्दुल सत्तारांवर जहरी टीका कुणाची?

देवेंद्रजी, हिरव्या सापाला उचलून फेकून द्या, अब्दुल सत्तारांवर जहरी टीका कुणाची?

| Updated on: Nov 08, 2022 | 12:46 PM

देवेंद्र फडणवीस यांनीच अब्दुल सत्तार यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी विनंती चंद्रकांत खैरे यांनी केलीय.

दत्ता कनवटे, औरंगाबादः अब्दुल सत्तार (Abdul Sattar) हा हिरवा साप आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना उचलून फेकून द्यावं, असं वक्तव्य शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केलं आहे. सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना शिवीगाळ केल्याने सोमवारपासून राजकीय वातावरण तापलं आहे. आज औरंगाबादमधील माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी सत्तारांवर जहरी टीका केली. ते म्हणाले, ‘ सुप्रिया सुळे चांगल्या असताना हा असा बोलतो. काहीही बोलतो. याला सरळ केलं पाहिजे. देवेंद्रजी यांना मी विनंती करतो. तुमचं नाव खराब होतं. हिरव्या सापाला तुम्ही उचलून फेकून द्या. एकनाथ शिंदे सरकार वाचवण्यासाठी दबले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनीच अब्दुल सत्तार यांच्याविरोधात कारवाई करावी, अशी विनंती चंद्रकांत खैरे यांनी केलीय.

Published on: Nov 08, 2022 12:46 PM