शनी हा देवांचा कायदामंत्री, गृहमंत्री! आता संजय राऊत शनिशिंगणापूरला येणार? चंद्रकांत खैरे काय म्हणाले? पाहा Video

शनी हा देवांचा कायदामंत्री, गृहमंत्री! आता संजय राऊत शनिशिंगणापूरला येणार? चंद्रकांत खैरे काय म्हणाले? पाहा Video

| Updated on: Nov 09, 2022 | 2:53 PM

शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे. त्यामुळे मी त्याला प्रार्थना केली होती, अशी माहिती खैरे यांनी दिली.

औरंगाबादः शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना जामीन मिळाल्यानंतर राज्यभरातील शिवसैनिकांच्या (Shivsainik) प्रतिक्रिया येत आहेत. औरंगाबादचे शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनीही प्रतिक्रिया दिली. 100 दिवस राऊत जेलमध्ये होते, मात्र तिथेही त्यांचं वाचन, लिखाण आणि चिंतन सुरु होतं. आता ते बाहेर आले आहेत. महाराष्ट्र आता त्यांना घाबरेल, असं वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलंय. तसेच राऊत बाहेर येण्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी विशेष पूजा केली होती. तसेच बाहेर आल्यानंतर कुटुंबासहित शनि शिंगणापूरला येऊ, असे राऊत यांनी कबूल केलं होतं, असंही खैरेंनी सांगितलं. शनी हा देवांचा कायदामंत्री आणि गृहमंत्री आहे. त्यामुळे मी त्याला प्रार्थना केली होती, अशी माहिती खैरे यांनी दिली.

Published on: Nov 09, 2022 02:52 PM