“युती सरकारमध्ये मोठं कांड होणार”, ठाकरे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेना आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरु आहे. असं असताना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्याने खळबळजनक वक्तव्य केलं आहे.
मुंबई: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. मंत्रिमंडळ विस्तारावरून शिवसेना आणि अजित पवार गटात रस्सीखेच सुरु आहे. असं असताना ठाकरे गटाच्या ज्येष्ठ नेत्याने खळबळजनक वक्तव्य केलं आहे. चंद्रकांत खैरे यांनी “राज्यातील युती सरकारमध्ये काहीतरी मोठं कांड होणार आहे,” असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. कारण हे सरकार अस्थिर आहे. सरकारमध्ये काहीही होऊ शकतं. जनतेचे प्रश्न खोळंबलेले आहेत. जनता यांना धडा शिकवेल. सरकार पडेल की नाही हे माहीत नाही. पण हे सरकार अस्थिर आहे. एवढं मात्र सांगू शकतो. पकडून-पकडून, रडत-पडत हे लोक सरकार चालवतीलही. पण अनेकांची नाराजी सध्या वाढत आहे. बच्चू कडू प्रामाणिक नेते आहेत. ते स्वाभिमानी पण आहेत. पण त्यांचा वापर करून घेतला जात आहे.अजित पवारांमुळे शिंदे गट नाराज आहे. असंतोष वाढत चालला आहे. त्यामुळे काहीतरी मोठं कांड होण्याची शक्यता आहे. हनुमानाची शपथ घेऊन सांगतो सरकारमध्ये काहीतरी मोठं कांड होणार आहे.”