तुम्ही 50 खोके घेतले, शेतकऱ्यांना किमान 50 पेट्या तर द्या, चंद्रकांत खैरेंचा सत्तारांना खोचक टोला

तुम्ही 50 खोके घेतले, शेतकऱ्यांना किमान 50 पेट्या तर द्या, चंद्रकांत खैरेंचा सत्तारांना खोचक टोला

| Updated on: Oct 23, 2022 | 12:57 PM

आज उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. मात्र यावरून आता जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे.

औरंगाबाद : आज उद्धव ठाकरे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. ते मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहेत. यावरून कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे यांचा दौरा अवघ्या 24 मिनिटांचा असल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे. दरम्यान अब्दुल सत्तार यांच्या या टीकेला ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी सत्तार यांना जोरदार टोला लगावला आहे. फिरण्याचं काम तुमचं आहे. ते तुम्ही करायलाच पाहिजे. तुम्ही 50 खोके घेतले,  शेतकऱ्यांना किमान 50 लाख तरी द्या असा खोचक टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे. शेतकरी संकटात आहेत,  मात्र सरकार स्वत:च्या गुंगीत असल्याची टीकाही चंद्रकात खैरे यांनी यावेळी केली आहे.

 

Published on: Oct 23, 2022 12:57 PM