‘उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणं बंद करा’, नितेश राणे यांना ठाकरे गटाचा इशारा
'सध्या एक टिंग्या रोज बोलतोय. हऱ्या नाऱ्याचे उद्योग काय होते ते त्या टिंग्याला काय माहिती. या टिंग्याने जर उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणं बंद नाही केलं तर त्याला जनतेला सामोरे जावे लागेल', असा इशारा ठाकरे गटाने दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर : ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी भाजप आमदार नितेश राणे यांचा ‘टिंग्या’ असा उल्लेख केला आहे.’सध्या एक टिंग्या रोज बोलतोय. हऱ्या नाऱ्याचे उद्योग काय होते ते त्या टिंग्याला काय माहिती. या टिंग्याने जर उद्धव ठाकरे यांच्यावर बोलणं बंद नाही केलं तर त्याला जनतेला सामोरे जावे लागेल’, असा इशारा चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. ‘महाविकास आघाडीच्या काळात एकही जातीय दंगल होऊ दिली नाही, मात्र शिंदे फडणवीस सरकार येताच मोठ्या प्रमाणात दंगली घडत आहेत’. तसेच राज्यात होणाऱ्या दंगली म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं फेल्युअर असल्याची टीका चंद्रकात खैरे यांनी केली आहे. ‘छत्रपती संभाजीनगर येथिल मुस्लिम जनता ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहे, हे लक्षात आल्यानंतर इम्तियाज जलील यांची महाविकास आघाडीत येण्यासाठी धडपड सुरू आहे. चुकून खासदार झालेले इम्तियाज जलील यांना आम्ही कधीही महाविकास आघाडीत घेणार नाही आणि त्यांनी येण्याचा प्रयत्न केला तर त्याला मी प्रखर विरोध करेल’, असंही चंद्रकांत खैरे यांनी सांगितलं. चंद्राकांत खैरे यांनी बोलताना भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.’पुढील येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राज्यात दंगली घडवायचं काम भारतीय जनता पार्टीच करत आहे. माजी राज्यपाल भगतसिंग कोशारी यांचे स्वागत करण्याचं कारण काय होतं ? शिवप्रेमींच्या भावना दुखवायचं काम भाजप करत आहे’.