जगाला उत्सुकता आहे की एकनाथ शिंदे कोण आहेत?; ‘या’ मंत्र्याचं वक्तव्य
CM Eknath Shinde Ayodhya Daura : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर 'या' मंत्र्याचं भाष्य; पाहा संपूर्ण व्हीडिओ...
पुणे : मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाष्य केलंय. अयोध्याला जाऊन रामाचं दर्शन घेणं यासारखा आनंद नाही. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकत्र दर्शनाला गेले आहेत. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघेही अतिशय लोकप्रिय आहेत. त्यामुळे ते अयोध्येला गेले आहेत. तिकडे गर्दी होतेय. उत्स्फूर्तपणे लोक येत आहेत. त्यांना भेटत आहेत. जगाला उत्सुकता आहे एकनाथ शिंदे कोण आहेत? शिंदे आधीच लोकप्रिय आहेत. आता त्यांची लोकप्रियता अधिकच वाढत आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
Published on: Apr 09, 2023 04:58 PM
Latest Videos