टिळक कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाही, पण…; चंद्रकांत पाटलांकडून शब्द
कसबा पोटनिवडणुकीसाठी दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आली नाही. तर भाजप नेते हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. पाहा...
कसबा पोटनिवडणुकीसाठी भाजपच्या दिवंगत नेत्या मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. तर भाजप नेते हेमंत रासने यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. अपेक्षेनुसार अश्विनी जगताप आणि हेमंत रासने यांची नाव केंद्रातून घोषित झाली आहेत. केंद्रातील भाजप नेत्यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानतो. दिवंगत मुक्ताताई टिळक यांचे पती शैलेश टिळक आणि मुलाला पक्षात योग्य ते स्थान दिलं जाईल, असा शब्द मी त्यांना देतो, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत. जगताप कुटुंबात कोणताही वाद नव्हता, विनाकारण चर्चा केली गेली. दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या मुलाने जी पोस्ट केली, त्यातून वाद नव्हता हे स्पष्ट झालं, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.
Published on: Feb 04, 2023 02:16 PM
Latest Videos