बावनकुळे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका; म्हणाले, ‘तशी क्षमता उद्धव ठाकरेंकडे नाही’
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली होती. त्यांनी भाजप आणि शिंदे गटाचा समाचार घेताना, भाजपशी पॅचअप करू शकलो असतो. पण ते माझ्या तत्वांमध्ये बसत नाही म्हणून नाही केलं.
नागपूर : 24 ऑगस्ट 2023 | उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमिवर पक्षबांधणीच्या कामाला वेग दिला आहे. तर त्यांनी राज्याच्या दौऱ्याकडे ही लक्ष केंद्रीत केलं आहे. यावेळी त्यांनी मातोश्रीत कार्यक्रर्त्यांना संबोधित करताना भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी, मी भाजपशी जुळवून घेतलं असतं पण त्यासाठी माझी नितीमत्ता तयार नव्हती. त्यामुळेच मी भाजपबरोबर गेलो नाही. तर माझा स्वाभिमान आणि शिवसेनेचा दरारा हा कायम ठेवणं गरजेचं होतं.
तर भाजप आणि शिंदे गटाला इशारा देताना ठाकरे यांनी त्यांच्यात हिंमत असेल तर निवडणुकीला सामोरं जावं असं म्हटलं आहे. त्यावरून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे.
बावनकुळे यांनी ठाकरेंना टोला लगावत, जे घरात बसून पक्ष चालवतात ते कोणालाच संपवू शकत नाहीत असे म्हटलं आहे. तसेच पक्ष चालविण्याची सवय लागते ती घरात बसून लागत नाही त्यासाठी 24 तासातले 18 तास काम करावं लागतं. घरात बसून ते करता येत नाही. तर 2024 पर्यंत ठाकरे यांच्या स्टेजवर फक्त ४ ते ५ लोक दिसतील, असा दावा देखील त्यांनी केलाय.