राष्ट्रवादीला मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे, म्हणून..., बावनकुळेंनी सांगितलं शिवसेना फुटीचं कारण

“राष्ट्रवादीला मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री आदित्य ठाकरे, म्हणून…,” बावनकुळेंनी सांगितलं शिवसेना फुटीचं कारण

| Updated on: Jun 20, 2023 | 6:41 AM

"भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद आदित्य ठाकरे यांना द्यायचा अंतर्गत प्लान होता," असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

मुंबई : “भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्री पद आदित्य ठाकरे यांना द्यायचा अंतर्गत प्लान होता,” असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. “हा अंतर्गत प्लान पवार आणि ठाकरेंमध्ये ठरला होता, आणि तो ठाकरेंच्या आमदारांना कळला होता”, असंही बावनकुळे यांनी म्हटलं आहे. “त्यामुळे भविष्य धोक्यात असल्याचं वाटल्यानं उद्धव ठाकरेंचे आमदार सोडून गेले. शरद पवारांचा राष्ट्रवादीचे 100 आमदार वाढवण्याचा प्लान होता. तसेच राष्ट्रवादीचा जिथे पालकमंत्री असेल तिथे ठाकरेंचा आमदार कमी करण्याचा प्लान होता,” असा गंभीर आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Published on: Jun 20, 2023 06:41 AM