“पंतप्रधान मोदी यांना देशाची चिंता तर विरोधकांना…” चंद्रशेखर बावनकुळे यांचं टीकास्त्र
पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आज 15 पक्षांची बैठक पाटण्यात पार पडली. महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे असे दिग्गज नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. याच बैठकीवरून भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे.
मुंबई : पंतप्रधान मोदी यांच्या विरोधात आज 15 पक्षांची बैठक पाटण्यात पार पडली. महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत, आदित्य ठाकरे असे दिग्गज नेते या बैठकीसाठी उपस्थित होते. याच बैठकीवरून भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार टीका केली आहे. ते म्हणाले की, विरोधक पाटण्याला एकत्र येत आहेत. सोनिया गांधी यांना विरोधकांना एकत्र करून राहुल गांधी यांना पंतप्रधान करायचं आहे. शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांना समोर करायचं आहे. उद्धव ठाकरे यांना आदित्य ठाकरे यांची चिंता आहे. विरोधकांनी एकत्रित मूठ बांधली तरी देशाची जनता ओळखून आहे. 2014 ला हेच झालं. 2019 ला मूठ बांधली होते. विरोधक एकत्रित आले होते. काही झालं नाही, असं बावनकुळे म्हणाले.
Published on: Jun 23, 2023 06:03 PM
Latest Videos