...तर उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या दर्शनासाठी कधी जाणार?, मुंबईतील बॅनरबाजीवरून भाजप नेत्याची टीका

“…तर उद्धव ठाकरे औरंगजेबाच्या दर्शनासाठी कधी जाणार?”, मुंबईतील बॅनरबाजीवरून भाजप नेत्याची टीका

| Updated on: Jun 23, 2023 | 9:15 AM

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, अशी इच्छा अजित पवार यांनी बोलून दाखवली.

यवतमाळ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वर्धापन दिनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली इच्छा व्यक्त केली होती. मला विरोधी पक्षनेत्यामध्ये फार काही इंटरेस्ट नव्हता. मला त्यातून मुक्त करा आणि संघटनेची जबाबदारी द्या, अशी इच्छा अजित पवार यांनी बोलून दाखवली. या विधानानंतर आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार यांच्या विधानावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिला आहे. ते म्हणाले की, “अजितदादा त्यांच्या पक्षातील कर्तृत्ववान नेते आहेत, त्यामुळे त्यांना कोणती संधी द्यायची हे शरद पवार यांनी ठरवावे.” चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. आंबेडकरांनी औरंजेबाचं दर्शन घेणं ठाकरेंना मान्य आहे का? जर हे उद्धव ठाकरे यांना मान्य असेल तर ते औरंगजेबाच्या दर्शनासाठी केव्हा जाणार आहेत?, असा खोचतक सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.

Published on: Jun 23, 2023 09:15 AM