अमरावतीत भाजप उमेदवाराचा पराभव; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

अमरावतीत भाजप उमेदवाराचा पराभव; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

| Updated on: Feb 03, 2023 | 2:57 PM

अमरावतीत अखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झालेत. भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. यावर भाजपचे प्रदेशााध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...

पुणे : अमरावतीत अखेर महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे विजयी झालेत. तब्बल 30 तासानंतर या निवडणुकीचा निकाल समोर आला आहे.भाजपचे उमेदवार रणजीत पाटील यांचा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. यावर भाजपचे प्रदेशााध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणुकीमध्ये आम्ही उत्तम प्रकारे लढलो. भाजप हरली असा रंग देत आहेत पण तो राजकीय रंग देत आहेत. अमरावतीमध्ये आम्ही चिंतन करू त्याचा अभ्यास करतो आहे, पुन्हा तिथे पराभव होता कामा नये. अमरावतीमध्ये आम्ही मागे पडलो. पण पुढे आम्ही जोरदार तयारी करू, असं बावनकुळे म्हणालेत.

Published on: Feb 03, 2023 02:57 PM