कसबा पोटनिवडणूक भाजपसाठी किती महत्वाची? कोण-कोण नेते प्रचारासाठी येणार? पाहा…
महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदेगटाकडून विजयाचा दावा केला जातोय. या निवडणुकीत भाजपची काय तयारीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहा...
पुणे : महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदेगट पूर्ण ताकदीनिशी कसबा पोटनिवडणुकीच्या मैदानात उतरलेत. दोन्ही बाजूने विजयाचा दावा केला जातोय. या निवडणुकीत भाजपची काय तयारीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कसबा पोटनिवडणूक हे आव्हान नाही. पण आम्ही प्रत्येक निवडणूक गांभीर्याने घेतो. तसंच या निवडणुकीचंही आहे. कसब्यात प्रचारासाठी केंद्रीय पातळीवर कुणी येणार नाही. सर्व राज्य पातळीवरचे नेते प्रचारात असतील. तर अमित शाहांचा दौरा नियोजित आहे, असंही बावनकुळे म्हणालेत. तसंच देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरेंच्या सभांचे रेकॉर्ड माझ्याकडे आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार असंच या सभांमध्ये म्हणण्यात आलं आहे. देवेंद्रजींनी कधीही सूड भावनेने कधी काम केलं नाहीय, त्यांचा विश्वासघात करण्यात आला, असंही बावनकुळे म्हणालेत.