संजय राऊत, टोमणे अन् भोंगा; चंद्रशेखर बावनकुळे यांची जोरदार टीका
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. यावेळी ते काय बोललेत? पाहा...
पिंपरी चिंचवड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेना ठाकरेगटाचे नेते, खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. पक्ष, चिन्ह हातातून गेलंय. आतातरी ठाकरेगटाने टोमणेबाजी थांबवावी. संजय राऊतांनी टीका करणं टाळावं. त्यांनी आपला सकाळचा भोंगा बंद करावा, असं म्हणत बावनकुळे यांनी संजय राऊतांची खिल्ली उडवली आहे. “भाजप आणि घटक पक्ष तारतम्य बाळगूनच आहेत. पण विरोधकांना पराभव दिसत असल्याने तेच तारतम्य विसारले आहेत”, असं म्हणत अजित पवार यांच्या टीकेला बावनकुळेंनी उत्तर दिलं आहे.
Published on: Feb 21, 2023 02:43 PM
Latest Videos