उद्धव ठाकरे यांच्या 'त्या' आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, हा मतदारांचा कौल ...

उद्धव ठाकरे यांच्या ‘त्या’ आरोपांवर चंद्रशेखर बावनकुळे यांचं प्रत्युत्तर; म्हणाले, “हा मतदारांचा कौल …”

| Updated on: Jul 10, 2023 | 3:14 PM

“भाजप नेते अमित शाहांनी शब्द पाळला असता तर भाजप आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे सत्तेत असते. मात्र, शाहांनी शब्द फिरवला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर आरोप केले.

नागपूर: ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या विदर्भ दौऱ्यात भाजपवर सडकून टीका केली आहे. “भाजप नेते अमित शाहांनी शब्द पाळला असता तर भाजप आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री अडीच-अडीच वर्षे सत्तेत असते. मात्र, शाहांनी शब्द फिरवला”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. याला प्रत्युत्तर म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर आरोप केले. ते म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांची स्मृती गेली आहे.2019 मध्ये मतपेटीनेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावे असा कौल दिला होता.मात्र तुम्ही तेव्हा बेईमानी केली. जनतेने मतपेटीतून निवडून दिलेल्या सरकारला सत्तेवर न येऊ देता तुम्ही शरद पवार सोबत कट करून सत्तेवर आले.”

Published on: Jul 10, 2023 03:14 PM