असा खोडसाळपणा पुन्हा होऊ नये, जाहिरातीवरून भाजप नेत्याचा शिवसेनेला सल्ला

“असा खोडसाळपणा पुन्हा होऊ नये”, जाहिरातीवरून भाजप नेत्याचा शिवसेनेला सल्ला

| Updated on: Jun 14, 2023 | 3:35 PM

‘राष्ट्रामध्ये मोदी, तर महाराष्ट्रात शिंदे' शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा फोटो आहे.

मुंबई : ‘राष्ट्रामध्ये मोदी, तर महाराष्ट्रात शिंदे’ शिवसेनेच्या या जाहिरातीमुळे राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. त्यामुळे आज शिवसेनेनं पुन्हा पहिल्या पानावर जाहिरात दिली आहे. या जाहिरातीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांचा फोटो आहे. तसंच, वरच्या बाजूला बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे फोटो दिसत आहेत.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं बोललं जात आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आज त्यांनी चांगल्या भावनेने जाहिरात दिली आहे.हेच युतीला अपेक्षित आहे. कालच्या जाहिरातीमध्ये खोडसाळपणा केला, आज तो दुरुस्त करण्याच काम झालं. जेव्हा युती करतो तेव्हा ज्यांची चूक असेल त्यांनी ती दुरुस्ती केली पाहिजे”, असं ते म्हणाले.

Published on: Jun 14, 2023 03:35 PM