कुर्बानीच्या बकऱ्यावरून राडा? आधी हनुमान चालीसाचं पठण नंतर जय श्रीरामचे नारे; कुठं घडलं नेमकं असं?
बकरा हा कुर्बानीसाठी आणला जातो. मात्र यावरूनच आता एका सोसायटीतील हिंदू-मुस्लिम आमने सामने आले आहेत. तर हे प्रकरण मिटविण्यासाठी पोलीसांना धाव घ्यावी लागली असून कायदा आणि सुवव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्धभवू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.
मीरा रोड (मुंबई) : मुस्लिम बांधवांचा ईद उल जुहा सण उद्या होणार आहे. हा सण कुर्बानीचा असतो. त्यासाठी बकरा हा कुर्बानीसाठी आणला जातो. मात्र यावरूनच आता एका सोसायटीतील हिंदू-मुस्लिम आमने सामने आले आहेत. तर हे प्रकरण मिटविण्यासाठी पोलीसांना धाव घ्यावी लागली असून कायदा आणि सुवव्यवस्थेचा कोणताही प्रश्न उद्धभवू नये म्हणून मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की, मिरा रोड पूर्वेच्या जेपी इन्फ्रा कॉम्प्लेक्समध्ये एक व्यक्ती बकरा घेऊन जात होता. त्यावेळी सोसायटीतील सुरक्षारक्षक आणि इतर काही लोकांनी त्याला विरोध केला. यावरून सोसायटीत वाद झाला. वादामुळे सोसायटीतील सर्व रहिवाशी खाली उतरून आले आणि त्यांनी त्याचा विरोध केला. इतकच नाही तर हनुमान चालीसाचं पठण देखील करण्यात आलं. याची माहिती मिळताच घटनास्थळी काशिमिरा पोलिस दाखल झाले. तर वाद मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र नागरिकांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या तर हनुमान चालीसाचं पठण करण्यात आले. यामुळे घटनास्थळी दोन डीसीपी एक एसीपी स्थानिक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांच्यासह मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.