Smriti Irani यांच्याविरोधातील आंदोलन प्रकरणी पुण्यातील कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आज पुणे दौऱ्यावर आल्या होत्या. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचं प्रकाशन इराणी यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान, इराणी यांच्याविरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेते आणि कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन केलं होतं.
पुणे : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या हस्ते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुस्तकाचे प्रकाशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात पार पडत आहे. त्यावेळी इराणी यांच्या कार्यक्रमात मोठा राडा (Chaos) पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होताच जोरदार घोषणाबाजी (Sloganeering)करण्यास सुरुवात केली. या घोषणाबाजीमुळे भाजपचा कार्यक्रम काही वेळ थांबवावा लागला. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आणि कार्यक्रमातून बाहेर काढलं. मात्र, घोषणाबाजी केल्यानंतर आपल्याला भाजपच्या महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनीही मारहाण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. दरम्यान आता पुण्यातून नवीन बाब समोर येत असून केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या कार्यक्रमात राडा केल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या 40 ते 50 महिला कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.