इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना मोफत धान्यपरुवठा केला जाणार,  छगन भुजबळ यांची घोषणा

“इर्शाळवाडीतील दुर्घटनाग्रस्तांना मोफत धान्यपरुवठा केला जाणार”, छगन भुजबळ यांची घोषणा

| Updated on: Jul 20, 2023 | 1:42 PM

रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत.अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेनंतर छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे.

मुंबई, 20 जुलै 2023 | रायगडच्या खालापूर तालुक्यातील इर्शाळवाडी गावात दरड कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. डोंगराचा कडाच कोसळल्याने खालापूरमधील इर्शाळवाडीतील घरे जमीनदोस्त झाले आहेत. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठी घोषणा केली आहे. जोपर्यंत परिस्थिती पूर्वपदावर येत नाही, तोपर्यंत दुर्घटनाग्रस्तांना शिधा पुरवला जाईल, अशी घोषणा छगन भुजबळ यांनी केली आहे.

Published on: Jul 20, 2023 01:42 PM