“संभाजी भिडे यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक व्हावी”, छगन भुजबळ यांची मागणी
काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. "15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उपवास करावा. या दिवशी दुखवटा पाळावा," असं भिडे म्हणालेत.संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.
नाशिक: काही दिवसांपूर्वी शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी भारतीय स्वातंत्र्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. “15 ऑगस्ट हा खरा स्वातंत्र्य दिवस नाही. याच दिवशी देशाची फाळणी झाली होती. त्यामुळे सर्वांनी या दिवशी उपवास करावा. या दिवशी दुखवटा पाळावा,” असं भिडे म्हणालेत.संभाजी भिडे यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. “संभाजी भिडे खरे म्हणजेच मनोहर भिडे यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक करायला पाहिजे. कारण त्यांनी सांगितलं की, 15 ऑगस्ट हा भारताचा स्वातंत्र्य दिन नाही. आपला लोकप्रिय असलेला तिरंगा झेंडा हा आपला राष्ट्रध्वज नाही. जन गण मन हे आपलं राष्ट्रगीत नाही. परंतु असं वक्तव्य दुसऱ्या कोणी केलं असतं. तर त्याला आतापर्यंत देशद्रोहाच्या आरोपाखाली ताबडतोब अटक केली असती. मनोहर असलेलं नाव बदलून संभाजी असं नाव लावतात आणि बहुजन समाजाच्या पोरांना फितवायचं काम करतात,” असं भुजबळ म्हणाले.