गुगली पुन्हा पडली? भुजबळ यांनी थेट शरद पवार यानांच केलं बाद; म्हणाले,‘तुमच्या गुगलीनं…’
अजित पवार यांच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा समोर आला आहे. तर काही दिवसांपुर्वी आपल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस बाद झाल्याचे शरद पवार यांनी म्हटलं होतं.
मुंबई : राज्याच्या राजकारणत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याने खळबळ उडाली आहे. एकाच राष्ट्रवादीचे पक्षाचे दोन मेळावे येथे पहायला मिळत आहेत. यावेळी अजित पवार यांच्या मेळाव्यातून पुन्हा एकदा पहाटेच्या शपथविधीचा मुद्दा समोर आला आहे. तर काही दिवसांपुर्वी आपल्या गुगलीवर देवेंद्र फडणवीस बाद झाल्याचे शरद पवार यांनी म्हटलं होतं. त्यावरून शरद पवार यांचे जवळचे मानले जाणारे छगन भुजबळ यांनीच आता शरद पवार यांच्यावर यावरून दोषी ठरवलं आहे. त्यांनी यावरून पडदा उठवताना, गुगली टाकून आपल्याच गड्याला बाद करायचं का? असा सवाल केला आहे. यावरून आता शरद पवार यांनीच तो शपथविधी घडवून आला का असा सवाल अनेकांच्या मनात घोळत आहे.
Published on: Jul 05, 2023 03:53 PM
Latest Videos