जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर भुजबळ यांनी दोनचं शब्दात दिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘अशा धमक्या पवार...’

जीवे मारण्याची धमकी आल्यानंतर भुजबळ यांनी दोनचं शब्दात दिली प्रतिक्रिया म्हणाले, ‘अशा धमक्या पवार…’

| Updated on: Jul 11, 2023 | 12:38 PM

याप्रकरणी पोलीसांनी कारवाई करत कोल्हापूरमधून एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. तर त्यांने ती धमकी दारुच्या नशेत दिल्याचे कळत आहे. तर प्रशांत पाटील असे भुजबळ यांच्या कार्यालयात फोनवरून धमकी देणाऱ्याचे नाव आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँगेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. त्यानंतर याप्रकरणी पोलीसांनी कारवाई करत कोल्हापूरमधून एका तरूणाला अटक करण्यात आली आहे. तर त्यांने ती धमकी दारुच्या नशेत दिल्याचे कळत आहे. तर प्रशांत पाटील असे भुजबळ यांच्या कार्यालयात फोनवरून धमकी देणाऱ्याचे नाव आहे. यानंतर यामागे बंडखोरी आणि पवार कुटूंबीय असल्याची चर्चा रंगली होती. कारण काहीच दिवसांपुर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडली असून यामागे भुजबल आणि प्रफुल्ल पटेल असल्याचे बोलले जात आहे. याचदरम्यान आता भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी आली आहे. त्यावरून भुजबळ यांनी थेट उत्तर देताना, पवार कुटुंबीय अशा धमक्या देण्याचं काम करत नाही. शरद पवार, अजित पवार हे वैचारिक लढाई लढणारी माणसं आहेत. ते असं करत नाहीत. तर काही अतिउत्साही लोकांमुळे अशी धमक्या येतात असेही भुजबळ यांनी म्हटलं आहे.

Published on: Jul 11, 2023 12:38 PM