Video : नाशिक लोकसभेसंदर्भात छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले
नाशिकमध्ये आमचे तीन आमदार आणि 70 नगरसेवक आहेत. त्यामुळे नाशिक आमचा बालेकिल्ला असल्याने आमचा दावा नाशिक लोकसभेसाठी प्रबळ असल्याचे भाजपाचे नेते ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी म्हटले आहे. त्यावर एकनाश शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी संकटमोचकाने शेपटीला आग लावून जाळपोळ नये, हे रामराज्य आहे असा सल्ला दिला होता. त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी वक्तव्य केले आहे.
नाशिक : नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीत जोरदार जोर बैठका सुरु आहेत. या ठिकाणी शिवसेना एकनाथ शिंदे गटाचा सिटींग खासदार हेमंत गोडसे असल्याने त्यांनी ही जागा आमच्या हक्काची असल्याचे म्हटले आहे. तर भाजपाने या जागेवर आपले तीन आमदार आणि 70 नगरसेवक असल्याने हा आमचा बालेकिल्ला असल्याचे म्हटले आहे. तर राष्ट्रवादीतून छगन भुजबळ या जागेसाठी इच्छुक असल्याचे म्हटले जात आहे. यावर आता मंत्री छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राधाकृष्ण विखे पाटील या भाजपा नेत्यांची बैठक झाली आहे. त्यांनी नाशिकच्या जागेवर दावा केला आहे. असा प्रश्न विचारला असता भुजबळ यांनी त्यावर शिंदे गटाचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत, त्यांनी प्रयत्न करण्यात अजिबात चूक नाही. भाजपाचे 100 च्या वर नगसेवक, आमदार आहेत. त्यांनी सुद्धा प्रयत्न करणे चूक नाही. ज्याला कोणाला तिकीट मिळेल, त्याचे काम आम्ही झटून करु असे भुजबळ यांनी म्हटले आहे.