सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे काय? छगन भुजबळ यांचा संतप्त सवाल
NCP Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांनी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर टीका केली आहे. ते नेमकं काय म्हणालेत? पाहा...
मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला प्रश्न विचारलेत. “शेतकऱ्यांच्या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी आम्ही करत होतो. पण कृषिमंत्री हे असंवेदनशील आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. कांदा शेतकऱ्यांना फक्त 300 रुपये प्रति क्विंटल अनुदान देणं, ही शेतकऱ्यांची थट्टा आहे. शेतकऱ्यांची मागणी होती की, 1000 रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळावं. पण आम्ही बोलत होतो 500 रुपये प्रति क्विंटल तरी अनुदान द्यावं. पण त्यांनी ते दिलं नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भात टिंगल टवाळी करणारी वक्तव्य या सरकारकडून होत आहेत. शेतकऱ्यांची चेष्टा लावली आहे काय?”, असा सवाल भुजबळ यांनी विचारला आहे.

कुंपणानेच शेत खाल्ले, दहावी मराठीचा पेपर केंद्र संचालकानेच फोडला?

तारकर्ली बिचवर मोठी दुर्घटना, 5 पर्यटक बुडाले, दोघांचा मृत्यू

'मोदींना पवार यांच्या बाजूला कसे..., ' काय म्हणाले संजय राऊत

तुळजा भवानी मातेच्या मूर्तीची जागा हलविणार ? काय आहेत घडामोडी
