शिवसेना फुटली याचं वाईट वाटतंय, तरी सुद्धा शिवसेना अभेद्य राहावी, ही मनातली इच्छा, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची शुभेच्छा!

“शिवसेना फुटली याचं वाईट वाटतंय, तरी सुद्धा शिवसेना अभेद्य राहावी, ही मनातली इच्छा”, राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची शुभेच्छा!

| Updated on: Jun 19, 2023 | 2:22 PM

शिवसेनेच्या इतिहासात आज पहिल्यांदा दोन वर्धापनदिन साजरा केला जातोय. त्यात ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीय. मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नाशिक : शिवसेनेच्या इतिहासात आज पहिल्यांदा दोन वर्धापनदिन साजरा केला जातोय. त्यात ठाकरे गटाला लागलेली गळती थांबण्याचं नाव घेत नाहीय. मनिषा कायंदे यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. याच पार्श्वभूमीवर माजी शिवसैनिक आणि राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “शिवसेना फुटली हे अजूनही मनाला पटत नाही. शिवसेना फुटली, याचं वाईट वाटतंय. राजकारणात उलट सुलट बोलत असलो. कायद्याच्या उलट सुलट गोष्टी करत असलो तरी लोक ठरवतात. जनता ठरवेल खरी शिवसेना कोणती ते. निषा कायंदे कशा काय तिकडे गेल्या, काही कळत नाही. त्या मला कट्टर शिवसैनिक वाटल्या होत्या. उद्धव ठाकरेसोबत राहतील असं वाटतं होतं. पण त्या शिंदेंसोबत गेल्या. त्यांनी हा निर्णय कसा घेतला कळत नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

Published on: Jun 19, 2023 02:22 PM